Team LokshahiRahul Gandhi Flying Kiss
ताज्या बातम्या
Rahul Gandhi Flying Kiss : राहुल गांधींनी सभागृहात फ्लाईंग किस दिल्याचा स्मृती इराणींचा आरोप
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणीत पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार स्मृती इराणी यांनी राहुल गांधीवर
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणीत पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार स्मृती इराणी यांनी राहुल गांधीवर संसदेत फ्लाईंग किस दिल्याचा गंभीर आरोप लावला आहे.
राहुल गांधी यांनी फ्लाईंग किस दिला. हा महिलांचा अपमान आहे. महिला खासदारांचा अपमान आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्यावर कारवाई करण्यात आली पाहिजे, अशी मागणीच स्मृती ईराणी यांनी केली आहे.
भाजपच्या महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे तक्रारीचं पत्र दिलं आहे. राहुल गांधींनी संसदेत केलेल्या गैरवर्तनासंदर्भात भाजपच्या 22 खासदारांनी तक्रारीचं पत्र दिल्याची माहिती आहे.