Smriti Mandhana Palash Muchhal
Smriti Mandhana Palash MuchhalSmriti Mandhana Palash Muchhal

Smriti Mandhana Palash Muchhal: वर्ल्डकप जिंकलं… आता आयुष्याचा कप जिंकण्याची वेळ, स्मृती मानधनाच्या होणाऱ्या जोडीदाराकडून कौतुक

आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप 2025 च्या फायनलमध्ये टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवला. 49 वर्षांनी भारतीय महिला क्रिकेट संघाने वर्ल्डकप जिंकून इतिहास रचला. विजयानंतर सोशल मीडियावर अनेक शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच, स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंड पलाश मुच्छलने इन्स्टाग्रामवर दोन पोस्ट शेअर केल्या.
Published by :
Riddhi Vanne
Published on

थोडक्यात

  • आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप 2025 च्या फायनलमध्ये टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवला.

  • 49 वर्षांनी भारतीय महिला क्रिकेट संघाने वर्ल्डकप जिंकून इतिहास रचला.

  • स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंड पलाश मुच्छलने इन्स्टाग्रामवर दोन पोस्ट शेअर केल्या.

आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप 2025 च्या फायनलमध्ये टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवला. 49 वर्षांनी भारतीय महिला क्रिकेट संघाने वर्ल्डकप जिंकून इतिहास रचला. 2 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या फायनलमध्ये टीम इंडियाने दमदार खेळी केली. यामध्ये स्मृती मानधनाची 45 धावांची खेळी महत्त्वाची ठरली.

विजयानंतर सोशल मीडियावर अनेक शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच, स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंड पलाश मुच्छलने इन्स्टाग्रामवर दोन पोस्ट शेअर केल्या. पहिल्या पोस्टमध्ये पलाशने स्मृतीच्या फोटोसोबत वर्ल्डकप ट्रॉफी घेतली आणि कॅप्शन दिलं, "सबसे आगे है हम हिंदुस्तानी..." दुसऱ्या पोस्टमध्ये पलाश आणि स्मृती क्रिकेट मैदानावर ट्रॉफीसह पोज देताना दिसले, ज्यावर चाहत्यांनी फायर आणि हार्ट इमोजी शेअर केले.

पलाश मुच्छल आणि स्मृती मानधना यांचा रिलेशनशिप 2019 पासून सुरू झाला. त्यांनी 2024 मध्ये इंस्टाग्रामवर त्यांचे नाते अधिकृत केले. पलाशने एका मुलाखतीत लवकरच स्मृतीचा इंदूरमध्ये विवाह होणार असल्याचं जाहीर केलं होतं. यामुळे त्यांच्या लग्नाच्या चर्चांना अधिकच वाव मिळाला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्मृती आणि पलाश यांचा लग्नसोहळा नोव्हेंबरमध्ये, विशेषत: 20 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. हा विवाह सांगलीत, स्मृतीच्या घरच्यांमध्ये पार पडणार आहे, कारण स्मृती लहानपणापासून सांगलीत राहते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com