Smriti Mandhana : स्मृती मानधना लग्नाबाबत अखेर सोडलं मौन म्हणाली "की लग्न रद्द..."
(Smriti Mandhana palash muchhal Wedding) भारताची स्टार खेळाडू स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नाची उत्सुकता चाहत्यांमध्ये खूप पाहायला मिळते. लग्न निश्चित तारखेला पुढे ढकलण्यात आले होते. पण आता मोठी अपडेट समोर आली आहे. स्मृती मानधना नुकतीच एक पोस्ट शेअर केली. यामुळे आता नवीन प्रश्न उपस्थितीत केला आहे.
तीने पोस्टमध्ये लिहिले की, "गेल्या काही आठवड्यांपासून माझ्या आयुष्याबद्दल अनेक तर्क-वितर्क केले जात आहेत आणि मला वाटते की आता मला या विषयी बोलणे महत्त्वाचे आहे. मी खूप खाजगी स्वभावाचा आहे आणि गोष्टी तशाच ठेवण्याची माझी इच्छा होती, पण मला स्पष्ट करणे गरजेचे आहे की लग्न रद्द करण्यात आले आहे.
मी ही बाब इथेच संपवू इच्छितो आणि तुम्हा सर्वांना विनंती करतो की तुम्हीही तसेच करा. या काळात दोन्ही कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करा आणि आम्हाला हे सर्व समजून घेण्यासाठी आणि आमच्या गतीने पुढे जाण्यासाठी थोडी मोकळीक द्या.
मला वाटते की आपणा सर्वांना मार्गदर्शन करणारा एक उच्च उद्देश आहे, आणि माझ्यासाठी तो उद्देश नेहमीच माझ्या देशाचं सर्वोच्च पातळीवर प्रतिनिधित्व करणे हा राहिला आहे. मी भारतासाठी शक्य तितक्या काळ खेळत राहू इच्छितो व ट्रॉफी जिंकू इच्छितो आणि तिथेच माझं लक्ष कायम केंद्रित राहील. तुमच्या सर्वांच्या समर्थनाबद्दल धन्यवाद. आता पुढे जाण्याची वेळ आली आहे."
नेमकं प्रकरण काय?
(Smriti Mandhana palash muchhal Wedding) स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नाच्या आधीच एक मोठा धक्का समोर आला आहे. रविवारी दुपारी स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर योग्य उपचार सुरू असून, आता त्यांची तब्येत स्थिर आहे. यानंतर, संध्याकाळी स्मृतीच्या होणाऱ्या पती पलाश मुच्छल यांचीही तब्येत बिघडली. सुरुवातीला घरीच उपचार करण्यात आले, पण नंतर त्यांना सांगलीतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याच्या प्रकृतीत सुधारणा होऊन, त्याला हॉस्पिटलमधून घरी सोडून देण्यात आले आहे.
स्मृती आणि पलाश यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू होती. त्यांचे मेहंदी आणि हळदीचे कार्यक्रम मोठ्या धूमधामात झाले होते, आणि त्यात भारताच्या विश्वविजेत्या संघातील खेळाडूही उपस्थित होते. पण लग्नाच्या दिवशी दोन वेळा प्रकृती बिघडल्याने दोघांनाही मोठा धक्का बसला. स्मृतीसाठी हा दिवस तणावाचा ठरला, कारण वडिलांची तब्येत आणि पतीची अस्वस्थता यामुळे तिच्या लग्नाच्या तयारीत अडचणी आल्या.
पलाश मुच्छल आणि क्रिकेटपटू स्मृती मानधना यांच्या लग्नाआधी समोर आलेल्या काही वैयक्तिक चॅट्समुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. पलाशचे मेरी डिकॉस्टा 'कोस्टासोबतचे फ्लर्टी मेसेजेस व्हायरल झाल्यानंतर त्याने स्मृतीची फसवणूक केली का, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. आता मेरीने स्वतः या प्रकरणावर भाष्य करत चॅट्स बाहेर आणण्यामागचं कारण स्पष्ट केलं आहे.

