Anjali Damania vs Devendra Fadnavis : दमानिया यांच्या टीकेला फडणवीसांचे प्रत्युत्तर " ओबीसींचा आवाज म्हणून भुजबळांकडे..."

भुजबळ शपथविधी: फडणवीसांचे दमानिया यांना प्रत्युत्तर, ओबीसींचा आवाज म्हणून भुजबळांचे स्वागत.
Published by :
Riddhi Vanne

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्या शपथविधीनंतर सर्व स्तरातून विविध प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली. भुजबळ यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या आणि पिटीशन फाईल करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या की, "एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी आता दुसरा भ्रष्ट मंत्री येणार",अशी टीका त्यांनी केली आहे, तर भाजपच्या भ्रष्टाचार के खिलाफ मोदी सरकार के बडे कदम..या घोषणेवरूनही त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

याचपार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, प्रत्येकांची वेगवेगळी मत असणार. त्याच्याबद्दल आम्हाला काहींही बोलायचे नाही. छगन भुजबळ हे ज्येष्ठ मंत्री आहेत. देशातला ओबीसींचा आवाज म्हणून छगन भुजबळांकडे पाहिले जाते. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने पुन्हा छगन भुजबळांना मंत्रीमंडळामध्ये निर्णय घेतला त्याचे आम्ही स्वागत करतो.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com