घरी लगीनघाई सुरु असतानाच नजर लागली, अंकिता वालावलकरच्या गाडीचा अपघात
सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आणि बिग बॉस मराठी फेम अंकिता वालावालकर सध्या खुप चर्चेत आहे. लवकरच ती कुणाल भगतबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे. मात्र लग्नाची घाई सुरु असतानाच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोकणहार्टेड गर्ल अंकिता वालावलकरचा साखरपुडा पार पडल्यानंतर त्याच रात्री अंकिताच्या गाडीचा अपघात झाला असल्याचे समोर आले आहे. याबद्दलची माहिती तिने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.
अंकिता व कुणाल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लगीनघाईचे अनेक फोटो सोशल मीडियावर बघायला मिळाले आहेत. नुकताच अंकिताचा साखरपुडा पार पडला मात्र साखरपुड्याच्या रात्री तिच्या गाडीचा अपघात झाला. अपघातानंतर तिने स्टोरी तिच्या सोशल मीडियाला शेअर केल्या आहेत. यामध्ये तिने अपघात झालेल्या गाडीचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिच्या गाडीचा आरसा फुटल्याचे दिसत आहे. मात्र अंकिता व कुणाल दोघंही सुखरुप असल्याचेही सांगितले.
काही दिवसांपूर्वी अंकिताने सोशल मीडियावर ‘ती येतेय’,‘ती आलीये…वाट बघतेय’,अशा पोस्ट शेअर करत तिच्या सगळ्या चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण केली होती. अंकिता नेमकं काय सरप्राइज देणार याची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर नव्या गाडीची पहिली झलक तिने फोटो शेअर करत सर्वांना दाखवली. अंकिता वालावलकरने आलिशान गाडी खरेदी केली.
अंकिताच्या आनंदाच्या क्षणी गाडीचा अपघात झाला आहे. आता लवकरच अंकिता व कुणाल बोहल्यावर चढणार आहेत. मेहंदी, साखरपुडा समारंभाचे अनेक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. आता त्यांच्या लग्नाकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.