Layer Shot Ads
Layer Shot AdsTeam Lokshahi

Layer Shot Ads: बलात्कारास प्रोत्साहन देणाऱ्या 'त्या' जाहिरातीवर सरकारची कारवाई

अनेकांनी जाहिरातीवर घेतला आक्षेप
Published by :
Team Lokshahi

बॉडी स्प्रे (Body Spray) ब्रँड लेयरच्या शॉट डियो ( Layer'r Shot) एका जाहिरातीवरुन चांगलाच वाद झाला. बलात्कराच्या प्रवृत्तीस प्रोत्साहन देणारी ती जाहिरात असल्याने महिला आयोग (Delhi Commission of Women) आक्षेप घेतला. त्यानंतर केंद्र सरकारने मोठी कारवाई करत Youtube- Twitter वरुनसुद्धा ती जाहिरात काढण्याचे आदेश दिले.

Layer Shot Ads
राज यांच्या सभेप्रमाणे उद्धव यांच्या सभेला 16 अटी, परंतु 'हा' आहे मोठा बदल

टीव्हीवर एका परफ्यूम ब्रँडची जाहिरात सुरू आहे, ही जाहिरात सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी या जाहिरातीला महिलाविरोधी म्हणत परफ्यूम ब्रँडवर कारवाई करण्याची मागणीही केली होती. या पार्श्वभूमीवर दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र लिहून परफ्यूम ब्रँडवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर याप्रकरणी दिल्ली पोलिसांना नोटीसही बजावण्यात आली आहे.

Layer Shot Ads
जळगाव : पोलीस निरीक्षकाच्या वाढदिवसाला कर्मचाऱ्यांचा पोलीस ठाण्यातच धांगडधिंगा

काय आहे ती जाहिरात?

खरंतर या जाहिरातीत एक मुलगा आणि एक मुलगी बेडवर बसलेले दाखवले आहे, त्या खोलीत आणखी चार मुले प्रवेश करतात. एका मुलाने विचारले, शॉट लागला आहे, असे वाटते. बेडवर बसलेला मुलगा म्हणतो हो मारला आहे. मग पहिला मुलगा बोलतो, आता आमची पाळी आहे आणि मग मुलीकडे सरकतो. हे संभाषण पाहून मुलगी हैराण आणि अस्वस्थ दिसते. परंतु तो मुलगा शॉट नावाची बॉडी स्प्रेची बाटली उचलतो आणि मुलगी स्वत:ला सुरक्षित समजते.

दुसरी जाहिरात अशीच

याच कंपनीच्या आणखी एका जाहिरातीत चार मुलं एका दुकानात एका मुलीचा पाठलाग करताना शिरतात. त्याच्या मागे उभं राहून तो बोलतोय, आम्ही चौघे आणि हा एक शॉट कोण घेणार. मुलांचे संभाषण ऐकून मुलगी घाबरते. त्याच पद्धतीने मुलगा पुन्हा शॉट नावाची बॉडी स्प्रेची बाटली उचलतो आणि मुलगी सुटकेचा नि:श्वास सोडते.

या प्रकरणाची स्वतःहून दखल घेत, DCW चेअरपर्सन यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला पत्र लिहून म्हटले आहे की जाहिराती सामूहिक बलात्काराच्या संस्कृतीला प्रोत्साहन देतात. बलात्काराच्या संस्कृतीला चालना देणाऱ्या अशा घाणेरड्या जाहिराती टीव्हीवर पुन्हा कधीही चालणार नाहीत याची खात्री करण्यासाठी एक मजबूत यंत्रणा उभारली पाहिजे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com