kalyan
kalyan Team Lokshahi

सोशल मिडीया बहाद्दरांनी शहरात पसरवली मुले पळविणारी टोळी सक्रिय असल्याची अफवा

पोलिसांकडुन अफवा पसरविणाऱ्यांच्या शोध सुरु

अमजद खान। कल्याण: लहान मुलांचे अपहरण करणारी टोळी कल्याणमध्ये सक्रीय झाली आहे, असा खोटा मेसेज पसरवून नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण करणारी अफवा कोण पसरवितो याचा तपास पोलिस करीत आहेत. कल्याण डोंबिवलीत सध्या सोशल मिडीयावरील या मेसेज मुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. सहावीत शिकणाऱ्या एका मुलीने काळी मास्कवाली बाई आणि काळ्य़ा कारची कथा सांगितली. तेव्हा पोलिसांनी सीसीटीव्ही चेक केल्यावर असा काही प्रकार नसल्याचे निष्पन्न झाले आहे. ही केवळ अफवा असल्याचे उघड झाले आहे. त्यासाठी पोलिसांनी जवळपास 53 सीसीटीव्ही तपासल्यावर ही बाब उघड झाली आहे.

kalyan
Uddhav Thackeray Live Update: संजय राऊत यांच्यासाठी मेळाव्यात खुर्ची

कल्याण डोंबिवलीत सोशल मिडियावर एक मेसेज व्हायरल केला जात आहे. मुले चोरी करणारी टोळी सक्रीय झाली आहे. आज एका क्लासेस काही लोक मुलांना पळवून नेत असल्याचे दिसून आले. पण तिथल्या स्टाफच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. आपल्या सर्वाना विनंती आहे की, आपल्या मुलांकडे बारीक लक्ष ठेवा असा मेसेज प्रत्येक मोबाईलवर दिसून येत आहे. अनेक लोकांनी हा मेसेज स्टेटसला दिसून येत आहे. वास्तविक असे काही नाही मात्र ही अफवा एका चुकीच्या कथेमुळे सुरु झाली. कल्याण पश्चिमेतील टिळक चौकातील एका शाळेतील सहावीच्या वर्गातील लहान मुलीने तिच्या आई वडिलांना सांगितले की, एक महिला जिच्या तोंडावर काळा रंगाचा मास्क होता. ती माझ्या जवळ आली. त्या महिलेसोबत एका काळ्य़ा रंगाची कारही होती.

आई वडिलांनी मुलीकडून ऐकलेली कथा शाळेच्या शिक्षकांना सांगितली. आणि हळूहळू ही कथा शहरात वा:यासारखी पसरली. घरी बसलेल्या सोशल मिडिया बदाद्दरांनी आपली कलाकारी सुरु केली. वेगवेगळ्य़ा शाळेच्या नावाने हा मेसेज पसरविला जात गेला. कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखळ घेत सगळ्य़ा प्रकारचा तपास सुरु केली. पोलिसांनी जवळपास प्रमुख ठिकाणचे 53 सीसीटीव्ही तपासले. असा काही ही प्रकार घडलेला नाही. ही एक कपोल कल्पीत कथा होती हे निष्पन्न मात्र पोलिसांनी याची गंभीर दखल घेत अफवा पसरविणाऱ्यांच्या शोध सुरु केला आहे. त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

Lokshahi
www.lokshahi.com