Solapur barshi Eknath shinde shivsena & Uddhav Thackeray party alliance against bjp zill parishad
Solapur barshi Eknath shinde shivsena & Uddhav Thackeray party alliance against bjp zill parishad

Eknath Shinde-Uddhav Thackeray : राजकारणाला नवं वळण! भाजपविरोधात शिंदे-उद्धव शिवसेना एकत्र येताच चर्चांना उधाण

बार्शीतील जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापले आहे. भाजपविरोधात दोन्ही शिवसेना एकत्र आल्यावर मंत्री जयकुमार गोरे यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली.
Published by :
Riddhi Vanne
Published on

बार्शीतील जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापले आहे. भाजपविरोधात दोन्ही शिवसेना एकत्र आल्यावर मंत्री जयकुमार गोरे यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली. लोकांना अशा जबरदस्तीच्या आणि विसंगत आघाड्या मान्य होणार नाहीत, असा ठाम दावा त्यांनी केला.

भाजप हा जिल्हा आणि राज्यात सर्वाधिक ताकदवान पक्ष असून, काही पक्ष केवळ आपले अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्र येत असल्याचे गोरे यांनी सांगितले. भाजपला हरवणे सोपे नाही, हे विरोधकांच्या लक्षात आल्यामुळेच अनेक पक्ष एकत्र येत असल्याची टीकाही त्यांनी केली. मात्र मतदार शेवटी भाजपलाच पाठिंबा देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आगामी सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचाच अध्यक्ष होईल, असे भाकीत करत त्यांनी महापालिकेबाबतही भूमिका स्पष्ट केली. सोलापूर महापालिकेत भाजपकडे मोठे संख्याबळ असून, गटनेता आणि महापौर हे दोन्ही पदे भाजपकडेच राहतील, असे त्यांनी सांगितले.

तसेच उमेदवारी देताना केवळ नातेसंबंध नव्हे तर कामगिरी महत्त्वाची असल्याचेही गोरे यांनी स्पष्ट केले. पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यावर भाजपचा भर राहील, असे ते म्हणाले.

थोडक्यात

  1. बार्शीतील जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले

  2. भाजपविरोधात दोन्ही शिवसेना एकत्र आल्याने राजकारणात खळबळ

  3. मंत्री जयकुमार गोरे यांची या आघाडीवर जोरदार प्रतिक्रिया

  4. “जबरदस्तीच्या आणि विसंगत आघाड्या लोकांना मान्य होणार नाहीत,” असा दावा

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com