Video Viral : हिंदुस्तान जिंदाबाद... लंडनमध्ये मुस्लिम मुलींचं तिरंग्यासाठी भिडल्या; नेमकं प्रकरण काय?

Video Viral : हिंदुस्तान जिंदाबाद... लंडनमध्ये मुस्लिम मुलींचं तिरंग्यासाठी भिडल्या; नेमकं प्रकरण काय?

ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त भारतीय समुदाय रस्त्यावर उतरल्यानंतर पुन्हा एकदा भारत–पाकिस्तान समर्थकांमध्ये तणाव निर्माण झाला.
Published by :
Team Lokshahi
Published on

ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त भारतीय समुदाय रस्त्यावर उतरल्यानंतर पुन्हा एकदा भारत–पाकिस्तान समर्थकांमध्ये तणाव निर्माण झाला. तिरंगा घेऊन उत्सव साजरा करणाऱ्या भारतीय मुलींना काही पाकिस्तानी युवकांनी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मुलींना त्रास देत ध्वज हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रसंगी भारतीय मुस्लिम मुली खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि कोणतीही भीती न बाळगता जोरदार प्रतिकार केला. शेवटी “हिंदुस्तान जिंदाबाद”च्या घोषणा देत त्यांनी विरोधकांना मागे हटायला भाग पाडले.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. अनेकांनी या मुलींच्या धैर्याचे कौतुक केले असून त्यांच्या देशभक्तीच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे. लंडनच्या रस्त्यांवर अशा प्रकारचे वाद पूर्वीही अनेकदा दिसून आले आहेत. पहलगाममधील दहशतवादी हल्ला असो वा ऑपरेशन सिंदूर, त्या वेळी देखील भारतीय आणि पाकिस्तानी नागरिकांमध्ये जोरदार वादविवाद आणि संघर्ष झाल्याचे अनुभवले गेले होते.

भारताचा स्वातंत्र्यदिन 15 ऑगस्टला आणि पाकिस्तानचा 14 ऑगस्टला असल्याने या काळात दोन्ही देशांचे नागरिक परदेशात मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरे करतात. त्यावेळी अशा चकमकी होण्याची शक्यता अधिक असते. यंदाही परिस्थिती तणावपूर्ण झाली, पण भारतीय मुस्लिम मुलींनी दाखवलेल्या धैर्यामुळे तिरंगा अभिमानाने लहरला. त्यांच्या निर्धाराने अनेकांना प्रेरणा मिळाल्याचे सोशल मीडियावरील प्रतिक्रिया दर्शवतात.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com