'सरकारमधील काही लोक मराठ्यांना चुचकारत आहेत' जयंत पाटील

'सरकारमधील काही लोक मराठ्यांना चुचकारत आहेत' जयंत पाटील

काल निवडणूक आयोगात पार पडलेल्या सुनावणीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
Published by  :
shweta walge

काल निवडणूक आयोगात पार पडलेल्या सुनावणीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली. निवडणूक आयोग आमचे मुद्दे ग्राह्य धरेल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

जयंत पाटील म्हणाले की, आमचे सर्व मुद्दे कागदावर आहेत. विरोधी गटाने १० वर्षांच्या मुलांचे, झोमॅटो डिलिव्हरी करणाऱ्या डिलिव्हरी बॉयचे, गृहिणींचे एफिडेवीट दिले आहेत. जिल्ह्यात ३२ जिल्हाध्यक्ष म्हणून एफिडेवीट दिले आहे. ज्यांचा पक्षाशी संबंध नाही. ज्यांना एफिडेवीट कशासाठी देतो हे ही माहिती नाही असे एफिडेवीट दिले आहेत असे ते म्हणाले. हा प्रकार अतिशय गंभीर आहे आणि निवडणुक आयोग ही बाब लक्षात ठेवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिवसेनेच्या प्रकरणात सुप्रिम कोर्टाने निर्णय दिला आहे. बहुसंख्य आमदार कुठे जातात त्याच्या मागे पक्ष जातो असे नाही. तर बहुसंख्य कॅडर कुठे आहे यावर पक्ष अवलंबून आहे. सुप्रीम कोर्टाने यावर स्पष्टीकरण दिले आहे त्यामुळे मला वाटत नाही की सुप्रिम कोर्टाच्या निकालाकडे दुर्लक्ष करून निर्णय दिला जाईल पण दिलाच तर पुढची पायरी आहे असे ते म्हणाले

मराठा आरक्षणाबाबत सरकारमध्ये असलेल्या मतभेदांवर भाष्य करताना ते म्हणाले की सरकारमधील काही लोक ओबीसींना चुचकारत आहेत तर काही मराठ्यांना चुचकारत आहेत. सरकारचा दोन्ही दरडींवर पाय ठेवण्याचा विचार असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की तुम्ही एकाठिकाणी बसा आणि याबाबत योग्य निर्णय करा असे आवाहन त्यांनी सरकारला केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कोणाच्याही भावना दुखवायचा नाही पण मराठा आरक्षणाबाबत काय करणार, ओबीसींचे काय करणार, धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा आहे. जे अतिशय महत्वाच्या पदांवर ते दोन्ही उपमुख्यमंत्री बोलत नाही, त्यांनी ही बोलले पाहीजे असेही म्हटले.

महाराष्ट्र गुंतवणुकीत चौथ्या क्रमांकावर गेला आहे. सरकार इव्हेंट करणायात इतके मशगुल आहेत. महाराष्ट्रातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडे वेळ नाही. गुंतवणूक महाराष्ट्र यावी यासाठीचे सरकारचे प्रयत्न कमी पडत आहेत. बेरोजगारीचा दर १० .९ इतका झाला आहे. यापेक्षा जास्त बेकारी असणार ही जास्त वाईट आहे. असं ते म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com