सुप्रिया सुळेंवर आरोप करत सोनिया दुहानचा शरद पवार गटाला रामराम?

सुप्रिया सुळेंवर आरोप करत सोनिया दुहानचा शरद पवार गटाला रामराम?

लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार गटाची काल (27 मे ) मुंबईत राष्ट्रीय बैठक पार पडली आहेत. या बैठकीला धीरज शर्मा आणि राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार गट विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा सोनिया दुहान यांनी उपस्थिती लावली होती.
Published by :
shweta walge

लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार गटाची काल (27 मे ) मुंबईत राष्ट्रीय बैठक पार पडली आहेत. या बैठकीला धीरज शर्मा आणि राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार गट विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा सोनिया दुहान यांनी उपस्थिती लावली होती. याशिवाय धीरज शर्मा यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. सोनिया दुहान यांनी अधिकृत प्रवेश केला नसला तरी त्या राष्ट्रवादींच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगत आहेत. यावरच सोनिया दुहानने स्पष्टीकरण दिले आहे. तसच यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर हल्लाबोल केला. पक्षात सर्व काही सुरळीत नाही…सुप्रिया सुळेंमुळे मला पक्ष सोडवा लागणार, असल्याचे सोनिया दुहान यांनी सांगितेल.

सोनिया दुहान म्हणाल्या, "मी शरद पवार यांना सोडलेले नाही आणि मी पक्ष सोडलेला नाही... या अफवा कोण पसरवत आहे हे मला माहीत नाही…. मी अजितदादांच्या पक्षात गेलेले नाही… शरद पवार यांच्याशी अनेक दशके जोडलेले नेते पक्ष का सोडत आहेत. याचा विचार सुप्रिया सुळेंनी करायला हवा… पक्षात सर्व काही सुरळीत चालत नाही… सुप्रिया सुळेंमुळे मला पक्ष सोडावा लागेल."

सुप्रिया सुळेंवर आरोप करत सोनिया दुहानचा शरद पवार गटाला रामराम?
Ajit Pawar: जरंडेश्वर कारखान्याची पुन्हा चौकशी सुरु! अजित पवारांच्या अडचणीत वाढ?
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com