Sonia Gandhi: सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

Sonia Gandhi: सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती अचानक खालवल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Published by :
shweta walge

काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती अचानक खालवल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सौम्य तापाच्या तक्रारीनंतर त्यांना रुग्णालयात आणण्यात आले.

सोनिया गांधी यांना ताप आल्यामुळे उपचारासाठी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिथल्या डॉक्टरांनी त्यांना त्यांच्या निगराणी खाली ठेवले आहे. सुत्रांच्या माहितीनुसार त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

Sonia Gandhi: सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
झिम्बाब्वेचे क्रिकेटपटू हिथ स्ट्रीक यांचं निधन; पत्नीने शेअर केली भावनिक पोस्ट

दरम्यान, सध्या राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. त्याचा विचार करता देशात लोकसभा निवडणुका लवकरचं होण्याची शक्यता आहेत. सोनिया गांधी या मागच्या महिन्यांपासून पुन्हा राजकीय बैठकांना उपस्थित राहत आहेत. काही दिवसांपूर्वी इंडिया आघाडीच्या बैठकीला देखिल त्या उपस्थित होत्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com