ब्लू टिकसाठी हात जोडणाऱ्या सेलिब्रिटींवर सोनू सूदची प्रतिक्रिया म्हणाला...
Admin

ब्लू टिकसाठी हात जोडणाऱ्या सेलिब्रिटींवर सोनू सूदची प्रतिक्रिया म्हणाला...

ट्विटर आजकाल ब्लू टिक मुळे खूप चर्चेत आहे.

ट्विटर आजकाल ब्लू टिक मुळे खूप चर्चेत आहे. ट्विटरने अमिताभ बच्चन, शाहरुख खान, प्रियांका चोप्रा यांच्यासह अनेक दिग्गजांच्या खात्यांसह अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींच्या खात्यांमधून ब्लू टिक्स काढल्या आहेत. आता मात्र अमिताभ बच्चन यांना ब्लू टिक परत मिळाला आहे. ट्विटरच्या या कृतीबद्दल सर्व स्टार्सनी ट्विट केले आणि ब्लू टिक परत करण्याची मागणी केली. आता अभिनेता सोनू सूदने ब्लू टिक संदर्भात एक ट्विट केले आहे, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सोनू सूदने आज सकाळी ट्विट केले ''भाई साहब को कौन समझाए ब्लू टिक खरीदना नहीं, कमाना पड़ता है, सोनू सूदच्या या ट्विटचे लोक कौतुक करत आहेत. सोनू सूदने आपल्या ट्विटमध्ये कोणाचेही नाव घेतले नाही, परंतु हात-पाय जोडून हातवारे करणाऱ्या सेलिब्रिटींची त्याने खिल्ली उडवली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com