Thackeray Brothers : ठाकरे बंधूंची पुन्हा भेट होणार, उद्धव ठाकरे गणेशोत्सवाच्या शुभ मुहूर्तावर शिवतीर्थावर जाणार?

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्तच्या भेटीनंतर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गणेशोत्सवाला मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Published by :
Prachi Nate

नुकतीच उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री निवासस्थानी जाऊन राज ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. यावेळी राज ठाकरेंनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खुर्चीला अभिवादन देखील केलं होत. त्याचसोबत 5 जुलैच्या मराठी मेळाव्यात देखील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मराठीच्या मुद्द्यावरुन एकत्र आलेले पाहायला मिळाले. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दोन्ही ठाकरे बंधूंची थेट भेट झाली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गणेशोत्सवाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दादर येथील शिवतीर्थ निवासस्थानी येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. राज ठाकरे यांच्या घरी दीड दिवसांचा बाप्पा येतो. यावर्षी राज ठाकरे यांच्या बाप्पाचं तिसरं वर्ष असून आतापर्यंत पहिल्याच दिवशी अनेक राजकीय नेत्यांनी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी हजेरी लावली होती.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com