Devendra Fadnavis : "बोलताना भान ठेऊन बोला" मुख्यमंत्र्यांनी टोचलं पडळकरांचे कान
थोडक्यात
सांगलीच्या जतमधील अभियंताच्या आत्महत्या प्रकरणावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली
भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांकडून जयंत पाटलांवर खालच्या पातळीवर टीका केली
या जहरी टीकेनंतर राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक झाला आहे.
यापार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्र्यांनी पडळकरांची चांगलेच कान टोचले.
Devendra Fadnavis On Gopichand Padalkar Statment : सांगलीच्या जतमधील अभियंताच्या आत्महत्या प्रकरणावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांकडून जयंत पाटलांवर खालच्या पातळीवर करण्यात आलेल्या जहरी टीकेनंतर राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक झाला आहे.
तसेच उद्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर ही जतमध्ये सकाळी मतदारसंघात येणार असल्याने उद्या जतमध्ये दोन्ही गटात संघर्ष निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे, तर जयंत पाटील हे उद्या सकाळी सांगलीमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की. "कोणाच्याही वडीलांबद्दल किंवा घरच्यांबद्दल विधान करणं योग्य नाहीये. यासंदर्भात गोपीचंद पडळकर यांच्याशी मी बोललेलो आहे. त्यांनाही मी सांगितलेलं की, अशा प्रकारच्या ज्या विधानाचे आम्ही कधीच समर्थन करत नाही. गोपीचंद पडळकर हे तरुण आणि आक्रमक नेते आहेत. आक्रमता दाखवता त्यांच्या बोलण्याचा कसा अर्थ निघेल यांचा ते विचार करत नाहीत.