Balasaheb Thorat On Ajit Pawar : "अजित पवारांचं ते वक्तव्य शेतकऱ्यांचा अपमान करणारं" थोरातांचा अजित पवारांना खोचक टोला

Balasaheb Thorat On Ajit Pawar : "अजित पवारांचं ते वक्तव्य शेतकऱ्यांचा अपमान करणारं" थोरातांचा अजित पवारांना खोचक टोला

आज शिर्डीमध्ये बोलताना कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी महायुतीला खोचक सल्ला दिला आहे. तसेच अजित पवारांवर टीका केली आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

आज शिर्डीमध्ये बोलताना काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी महायुतीला खोचक सल्ला दिला आहे. यावेळी ते म्हणाले की, महायुतीनं निवडणुकीत शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे आता त्यांनी बनवाबनवी न करता हे आश्वासन पाळलं पाहिजे. अजित पवारांकडून शेतकरी कर्जमाफीविषयी केलेल्या वक्तव्य अपेक्षा नव्हती.

शेतकऱ्यांचा अपमान करणारे ते वक्तव्य आहे. आज जगभर मंदीची लाट असताना भारताची अर्थव्यवस्था शेतकऱ्यांच्या कष्टांवर चालली आहे. त्यामुळे संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं गरजेचं आहे.

अजित पवारांचं हे वक्तव्य त्यांना शोभणारे नाही, असं मत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं. सत्तेवर गेल्यानंतर अशा प्रकारची विधाने करणं निषेधार्ह आहे. 2014 पासून भाजपला ‘जुमला’ पद्धतीची सवय लागली आहे आणि आता त्यांच्या मित्रपक्षांनीही तीच पद्धत स्विकारल्याच दिसत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com