चिपळूणमधील राड्यानंतर लोकशाही मराठीवर भास्कर जाधवांची विशेष मुलाखत

भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांची गुहागर येथे जाहिर सभा पार पडत आहे. यावेळी नीलेश राणे याची मिरवणूक भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर जात असताना भास्कर जाधव आणि निलेश राणे यांच्या कार्यकर्ते भिडल्याचे पाहायला मिळाले.
Published by :
shweta walge

भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांची गुहागर येथे जाहिर सभा पार पडत आहे. यावेळी नीलेश राणे याची मिरवणूक भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर जात असताना भास्कर जाधव आणि निलेश राणे यांच्या कार्यकर्ते भिडल्याचे पाहायला मिळाले. यावेळी राणे समर्थक आणि ठाकरे समर्थकांनी एकमेकांवर दगडफेक करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलीसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधूराच्या कांड्या देखील फोडल्या. यानंतर भास्कर जाधव यांनी लोकशाही मराठीला प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले की, काही दिवसांपूर्वी नारायण राणेंनी सांगितलं की, भास्कर जाधवांना आम्ही चोप देणार. निलेश राणेंनी सांगितलं की भास्कर जाधवांच्या मतदार संघात जाणार आणि उत्तर देणार या सगळ्यावर मी काही प्रतिक्रिया दिली नाही. कोणालाही कुठेही जाऊन सभा घेण्याचा अधिकार आहे. फक्त राणेंनांच असं वाटत की, आम्ही कुठेही जाऊन सभा घ्यायची पण दुसऱ्यांनी आमच्याकडे येऊन सभा घ्यायची नाही आणि बोलायच नाही. आज माझ्या मतदार संघात त्यांची सभा होणार होती. त्या जाहीरातबाजी देखिल केली होती. टीझर प्रदर्शित केला होता. त्यांनी चिडवण्याचं काम मोठ्या प्रमाणात केलं. निलेश राणे मुंबईहून गुहागरला सभेला येणार होते. मुंबईहून निघालेल्या माणसाला दापोलीमार्गी गुहागरला जाण्याचा मार्ग आहे. परंतु ते 7 कीलोमीटर जवळ आले तिथून आणखी एक गुहागरला जाण्याचा मार्ग आहे. तो मार्ग सोडून ते चिपळूनला आले. त्यांनी अशा प्रकारच्या बातम्या पसरवल्या की मी भास्कर जाधवांच्या कार्यालयासमोर जाणार आणि तिथे धिंगाणा करणार. मग मी पोलिसांना सांगितलं की त्यांनी कार्यालयासमोर कोणत्याही प्रकारची अनुचित प्रकार करु नये. पण...

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com