Special Report Soyabin Crop Loss :  महापुरात सोयाबीन कुजली, शेतकरी हतबल
Special Report Soyabin Crop Loss : महापुरात सोयाबीन कुजली, शेतकरी हतबल; सरकार बळीराजाला तारणार का?Special Report Soyabin Crop Loss : महापुरात सोयाबीन कुजली, शेतकरी हतबल; सरकार बळीराजाला तारणार का?

Special Report Soyabin Crop Loss : महापुरात सोयाबीन कुजली, शेतकरी हतबल; सरकार बळीराजाला तारणार का?

कारंजा तालुक्यातील गवंडी येथील योगेश मानमोडे यांच्याकडे पाच एकर शेती यामध्ये त्यांनी सोयाबीनची पेरणी केली. पेरणीपासून आतापर्यंत जवळपास जवळपास एक लाख खर्च करण्यात आला.
Published on

Special Report Soyabin Crop Loss : वर्धा जिल्ह्यात सोयाबीन पिकं मोठ्या प्रमाणात घेतलं जातं, सोयाबीनचे पिक शेतकऱ्याचं नगदी पिकं म्हणून ओळखलं जाते. याच पिकावर शेतकऱ्याची वार्षिक आर्थिक समीकरणं अवलंबून असतात. मात्र यंदाच्या महापुरात सोयाबीन पूर्णतः कुजली आहे. शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चिखल झाला, आणि कष्ट पाण्यात वाहून गेले. त्यामुळे सरकार शेतकरयांच्या डोळ्यातले अश्रू पुसणार का? हाच सवाल आहे.. वाचुयात...

कारंजा तालुक्यातील गवंडी येथील योगेश मानमोडे यांच्याकडे पाच एकर शेती यामध्ये त्यांनी सोयाबीनची पेरणी केली. पेरणीपासून आतापर्यंत जवळपास जवळपास एक लाख खर्च करण्यात आला. या सोयाबीनच्या पिकातून चांगलं उत्पन्न निघेल अशी या शेतकऱ्याला अपेक्षा होती. मात्र या शेतकऱ्याच्या सगळ्या स्वप्नांवर पाणी फेरलंय. काबाडकष्ट करून पिकवलेल्या सोयाबीनवर आधी येलो मोजॅक रोगाचा पादुर्भाव आणि नंतर अतिपावसामुळे सोयाबीन पूर्णतः उद्धवस्त झाली आहे. पाण्यात बुडालेल्या सोयाबीनला अंकुर फुटले तर काही सोयाबीन कुजल्याने शेतकऱ्याचा अक्षरशः कणा मोडला. सरकारने लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतात.

सोयाबीनच्या लागवडीसाठी केलेला खर्चही निघत नसल्याने बळीराजा हतबल झालाय. स्वतःच्या शेतात मनासारखे उत्पन्न निघत नसलायने शेतकऱ्यांना दुसरीकडे मोलमजुरी करण्याची वेळ आलीये. आता आम्हाला आधार कुणाचा अशी व्यथा शेतकरी मांडतात.

दिवाळी तोंडावर असतांना शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढवलय. दरवर्षी निसर्ग कोपत असल्याने शेतकऱ्यांनी कराव तरी काय असा प्रश्न शेतकरी उपस्थित करतात. एकीकडे निसर्गाची साथ नाही सरकारची मदतही तुटपुंजी त्यामुळे बळीराजाने जगायचे तरी कसे असा सवाल शेतकरी उपस्थित करतात.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com