५१ रुपयांचा आजोबांचा किस्सा, खळखळून हसले श्रीकांत शिंदे

५१ रुपयांचा आजोबांचा किस्सा, खळखळून हसले श्रीकांत शिंदे

आज खासदार श्रीकांत शिंदे हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांना एक आजोबा भेटले.
Published by :
shweta walge

आज खासदार श्रीकांत शिंदे हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांना एक आजोबा भेटले. त्यांनी श्रीकांत शिंदे यांच्यासोबत मनसोक्त संवाद साधला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मधील प्रत्येक सेकंदात अत्यंत आनंदाने भेटलेले एक वयस्कर आजोबा हे सरकार कसे सर्वसामान्यांचे आहे हेच अधोरेखित करत आहे. हा सोशल मिडीयावर चांगलाच चर्चेत येत आहे.

असा केला आजोबांनी श्रीकांत शिंदेसोबत केलेला संवाद

" माझ तिकिटाचे पूर्ण पैसे परत दिले"

" अरे लेकरा, तुझी वाट बघत तासभर थांबलो.."

" आम्ही म्हतारी माणसे, आमच्या कशाला पाया पडतो.."

" दिवसभर बघत असतो साहेबांचे फोटो, बातम्या.."

आणि शेवटी उस्फूर्तपणे "शिंदे साहेबांचा विजय असो..!" ही घोषणा..!

वरील सगळे डायलॉग आहेत सहज कोल्हापूर दौऱ्यात डॉ. श्रीकांत साहेबांना भेटलेल्या आजोबांचे..!

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com