Education News : धाकधूक वाढली!
Education News : धाकधूक वाढली! दहावी बारावीच्या बोर्डाचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या कधीपासून होतात परीक्षा Education News : धाकधूक वाढली! दहावी बारावीच्या बोर्डाचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या कधीपासून होतात परीक्षा

Education News : धाकधूक वाढली! दहावी बारावीच्या बोर्डाचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या कधीपासून परीक्षा होणार सुरु ?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 2026 साली होणाऱ्या दहावी (SSC) आणि बारावी (HSC) बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत.
Published by :
Riddhi Vanne
Published on

ssc and hsc exam date declare pune board of 10th and 12th board exams announced by msbshse pune : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 2026 साली होणाऱ्या दहावी (SSC) आणि बारावी (HSC) बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. बारावीची लेखी परीक्षा 10 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 दरम्यान होईल. दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 या कालावधीत घेतली जाईल. साधारणतः, दहावी आणि बारावीच्या परीक्षा प्रत्येक वर्षी मार्च महिन्यात सुरू होतात, पण यंदा दोन्ही परीक्षांचे आयोजन दोन आठवडे लवकर करण्यात आले आहे.

परीक्षेचे वेळापत्रक:

बारावी लेखी परीक्षा: 10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026

दहावी लेखी परीक्षा: 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026

प्रात्यक्षिक परीक्षा:

बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा 23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2026 दरम्यान होणार आहेत. दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा 2 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी 2026 दरम्यान होईल. तसेच, विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रात्यक्षिक परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापन कार्य देखील याच कालावधीत होईल. अंतिम वेळापत्रक आणि इतर तपशील शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर लवकरच प्रकाशित केले जातील.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com