SSC Hall Ticket : दहावीच्या परीक्षेचं प्रवेशपत्र उद्यापासून मिळणार

SSC Hall Ticket : दहावीच्या परीक्षेचं प्रवेशपत्र उद्यापासून मिळणार

राज्य मंडळातर्फे माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच दहावीची बोर्डाची परीक्षा १ ते २६ मार्च दरम्यान होत आहे.
Published on

राज्य मंडळातर्फे माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच दहावीची बोर्डाची परीक्षा १ ते २६ मार्च दरम्यान होत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना माध्यमिक शाळांमध्ये उद्यापासून देण्यात येणार आहे.

माध्यमिक शाळांना मार्च २०२४ च्या परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर ‘स्कूल लॉगिन’मध्ये डाउनलोड करून घेण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा १० फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या शाळांमार्फत ही प्रवेशपत्र मिळणार आहेत, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांच्याकडून देण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com