10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंबंधीचा 'तो' निर्णय रद्द; शिक्षणमंत्री म्हणाले...

10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंबंधीचा 'तो' निर्णय रद्द; शिक्षणमंत्री म्हणाले...

दहावी बारावी परीक्षेबाबत विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे.

दहावी बारावी परीक्षेबाबत विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा यंदा 21 फेब्रुवारी ते 25 मार्चदरम्यान घेतली जाणार आहे. यावेळी दहावी- बारावी परीक्षेत यंदा बैठे पथक विशिष्ट शाळेत पूर्णवेळ हजर राहणार आहे.

याच पार्श्वभूमीवर आता शिक्षणमंत्र्यांनी महत्वाची माहिती दिली आहे. बोर्डाने प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका देण्याचा निर्णय रद्द केला आहे. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका नीट वाचून पेपर कसा सोडवायचा आणि नीट वाचण्यासाठी दहा मिनिटे दिली जायची. मात्र, हा निर्णय रद्द केला आहे.

यावर दिपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, कॉपीमुक्त महाराष्ट्राचं अभियान राबवलं जात आहे. १० मिनिटांच्या गोल्डन वेळेत पेपर लिक होऊ नये, यादृष्टीने हा प्रयोग केलेला आहे. विद्यार्थ्यांना अडचण करण्याचा हेतू नाही'. असे त्यांनी सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com