Board Exam Result
Board Exam ResultTeam Lokshahi

10वी, 12वी चा निकाल 'या' दिवशी होणार जाहीर

दरवर्षी या दोन्ही इयत्तांचा निकाल हे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ते जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत समोर येत असतो.
Published by :
Vikrant Shinde

बोर्डाकडून 10वी व 12वीच्या (SSC, HSC Results) निकालाबाबत महत्वाची माहिती देण्यात आली आहे. बोर्डाकडून असे सांगण्यात आले आहे की, दोन्ही वर्गांच्या बोर्ड परीक्षांची पेपर तपासणी जवळपास पूर्ण झाली आहे. त्यामुळे इयत्ता 10वीचा निकाल हा 20 जूनपर्यंत व 12वीचा निकाल 20 जूनपर्यंत लागणार अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे.

Board Exam Result
Gunaratna Sadavarte : सदावर्ते यांचे राजकारणात एन्ट्रीचे संकेत

दरवर्षी या दोन्ही इयत्तांचा निकाल हे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ते जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत समोर येत असतो. परंतू, यंदा राज्यातील शिक्षक आणि संस्थाचालक संघटनांनी पेपर तपासणीवर टाकलेला बहिष्कार व विनाअनुदानित शाळा संघटनेच्या प्रतिनिधींनी पेपर तपासण्यास दिलेला नकार यामुळे 10वी व 12वीचा निकाल वेळेत लागेल की नाही अशी शंका उपस्थित केली जात होती. मात्र आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनंतर निकाल हा ठरलेल्या वेळेतच समोर येईल असे चित्र दिसतं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com