ताज्या बातम्या
ऐन गणेशोत्सवात एसटी सेवा ठप्प होण्याची शक्यता; एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा
ऐन गणेशोत्सवात एसटी सेवा ठप्प होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ऐन गणेशोत्सवात एसटी सेवा ठप्प होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 3 सप्टेंबरपासून एसटी कर्मचाऱ्यांकडून संपाचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे. आर्थिक मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटना एकत्र आहेत.
या संपामुळे आता नागरिकांचे हाल होण्याची शक्यता आहे. येत्या आठ दिवसांत राज्य सरकारने मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतली नाही, तर येत्या 3 सप्टेंबरपासून राज्यभर संप करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांकडून पुन्हा संपाची हाक दिली आहे. त्यामुळे आता ऐन गणेशोत्सवात एसटी सेवा ठप्प होण्याची शक्यता आहे.

.png?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)