ताज्या बातम्या
एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटला; अमरावती जिल्ह्यातील एसटी बससेवा पूर्ववत
एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटलेला आहे.
सूरज दहाट, अमरावती
एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटलेला आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर हा संप एसटी कर्मचाऱ्यांनी मागे घेतलेला आहे. संप मिटल्याने लाखो प्रवाशांचा जीव भांड्यात पडलेला आहे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांचा मूळ वेतनात तब्बल 6500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
याच पार्श्वभूमीवर आता संप मिटल्यानं अमरावती जिल्ह्यातील एसटी बससेवा पूर्ववत झाली असलेलं पाहायला मिळत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती.
एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटल्याने आता आजपासून अमरावतीच्या आठही आगारातील बससेवा सुरळीत झालेली पाहायला मिळत आहे.