एसटी कर्मचारी संघटना पुन्हा आंदोलनाच्या तयारीत

एसटी कर्मचारी संघटना पुन्हा आंदोलनाच्या तयारीत

एसटी कर्मचारी संघटना पुन्हा आंदोलनाच्या तयारीत असल्याचे पाहायला मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

एसटी कर्मचारी संघटना पुन्हा आंदोलनाच्या तयारीत असल्याचे पाहायला मिळत आहे. 9 आणि 10 जुलै रोजी आझाद मैदानात धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळणे, महागाई भत्ता, वाढीव घरभाडे, वार्षिक वेतनवाढ अशा विविध 13 प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी एसटी महामंडळातील सर्व कर्मचारी संघटनांकडून आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

9 व 10 जुलै रोजीच्या विधिमंडळाच्या अधिवेशनावर आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनाची दखल घेतली नाही, तर ९ ऑगस्ट २०२४ रोजीपासून राज्यभरात तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com