ST Employees strike : एसटी कर्मचाऱ्यांचं आगळं-वेगळं आंदोलन, “बेमुदत ठिय्या “आंदोलनाचा इशारा

ST Employees strike : एसटी कर्मचाऱ्यांचं आगळं-वेगळं आंदोलन, “बेमुदत ठिय्या “आंदोलनाचा इशारा

थकीत महागाई भत्ता, वेतनवाढ फरकाची रक्कम व इतर थकीत देणी अशी मिळून कर्मचाऱ्यांची चार हजार कोटी रुपयांची थकीत देणी व इतर प्रलंबित मागण्यासाठी झोपलेल्या एसटी प्रशासनाला जाग आणण्यासाठी रविवार 12 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 12 वाजता, एसटीच्या मुंबई सेंट्रल येथील मध्यवर्ती कार्यालयावर “मशाल मोर्चा” काढण्यात येणार
Published by :
Team Lokshahi
Published on

थोडक्यात

  • एसटी कर्मचाऱ्यांचं आगळं-वेगळं आंदोलन

  • एसटी कर्मचाऱ्यांचं 13 ऑक्टोबर 2025 रोजी आंदोलन

  • 12 ऑक्टोबर 2025 रोजी “मशाल मोर्चा” काढण्यात येणार

थकीत महागाई भत्ता, वेतनवाढ फरकाची रक्कम व इतर थकीत देणी अशी मिळून कर्मचाऱ्यांची चार हजार कोटी रुपयांची थकीत देणी व इतर प्रलंबित मागण्यासाठी झोपलेल्या एसटी प्रशासनाला जाग आणण्यासाठी रविवार 12 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 12 वाजता, एसटीच्या मुंबई सेंट्रल येथील मध्यवर्ती कार्यालयावर “मशाल मोर्चा” काढण्यात येणार असून त्या रात्री पासूनच म्हणजेच सोमवारी दिनांक 13 ऑक्टोबर 2025 पासून”बेमुदत ठिय्या “ (ST Employees strike) आंदोलन सुरू करण्यात येणार आहे असल्याची माहिती महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली आहे.

एसटीच्यास्थापने पासून कर्मचाऱ्यांची आंदोलने पाहिली तर अशा प्रकारचे रात्री बारा वाजता आगळे वेगळे आंदोलन या पूर्वीच्या काळात कधीही झालेले नसून या आगळ्या वेगळ्या आंदोलनाची झलक म्हणजेच सादरीकरण साधारण 300 पदाधिकारी हातात मशाल व मागण्यांचे फलक हातात घेऊन, टिळक भवन,दादर, मुंबई येथे संघटनेचे अध्यक्ष,आमदार भाई जगताप यांच्या उपस्थितीत,सोमवार दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी ठीक 12-00 ते 2-00 वाजे पर्यंत करणार आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाचा टीझर सादरीकरण करताना संघटनेचे कार्यकर्ते मागण्यांचे फलक व मशाल हातात घेऊन गणवेश घालून सादरीकरण करतील.एसटीच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा वेगळ्या प्रकारचे आंदोलन होणार असून टीझरच्या माध्यमातून सरकार व एसटी या दोघांनाही आंदोलनाचा इशारा देण्यात येणार असल्याची माहितीही बरगे यांनी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com