Maharashtra Cabinet Decisions : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीने सर्वसामान्यांना दिलासा, बैठकीत घेतले 8 महत्त्वाचे निर्णय

Maharashtra Cabinet Decisions : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीने सर्वसामान्यांना दिलासा, बैठकीत घेतले 8 महत्त्वाचे निर्णय

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय, मच्छिमारांना कृषीप्रमाणे लाभ, गोसीखुर्द धरणासाठी मोठी तरतूद.
Published by :
Prachi Nate
Published on

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज 8 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.त्यामध्ये, मंत्री नितेश राणेंच्या मत्य खात्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय झाला.

मच्छिमारांना कृषीप्रमाणे सर्व लाभ मिळणार आहेत. या बैठकीत सर्वच नेत्यांनी उपस्थिती लावली होती. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. ज्यात भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणासह कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला. या कॅबिनेट बैठकीत घेण्यात आलेले निर्णय जाणून घ्या.

कॅबिनेट बैठकीत घेण्यात आलेले 8 महत्त्वाचे निर्णय

  1. ग्रामविकास विभाग

    सातारा जिल्ह्यातील येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासाठी 142.60 कोटी दिले जाणार आणि महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी 67.17 लाख दिले जाणार.

  2. जलसंपदा विभाग

    भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणाच्या प्रकल्पासाठी 25 हजार 972 कोटी 69 लाखांची तरतूद

  3. कामगार विभाग

    राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करण्यात येणार असून महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  4. महसूल विभाग

    विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्त कंत्राटी विधी अधिकाऱ्यांना 35 हजार ऐवजी 50 हजार मानधन मिळणार.

  5. विधी व न्याय विभाग

    14 व्या वित्त आयोगामार्फत राज्यात तात्पुरत्या स्वरुपात स्थापन करण्यात आलेल्या 16 अतिरिक्त न्यायालयांना व 23 जलदगती न्यायालयांना आणखी 2 वर्षे मुदतवाढ तर येणाऱ्या खर्चास मान्यता.

  6. मत्स्यव्यवसाय विभाग

    मत्स्यव्यवसायास चालना देण्यासाठी कृषी क्षेत्रा सारखाच दर्जा तर आवश्यक पायाभूत सुविधा, सवलतीचा लाभ देण्याचा निर्णय.

  7. गृहनिर्माण विभाग

    पायाभूत सुविधांच्या अमंलबजावणीत बाधित झोपडपट्टी पुनर्वसनाच्या योजनेतील घरांची निर्मितीत सुधारणा

  8. सार्वजनिक बांधकाम विभाग

    पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील तळेगाव ते चाकण यावर चार पदरी, चाकण ते शिक्रापूर सहा पदरी रस्ता तयार करण्याचा निर्णय

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com