ताज्या बातम्या
CM Devendra Fadnavis Meet Raj Thackeray : उद्धव ठाकरे नंतर मुख्यमंत्र्यांची शिवतीर्थावर उपस्थिती, नेमकं प्रकरण काय?
मुख्यमंत्री फडणवीस राज ठाकरेंच्या गणपती दर्शनाला शिवतीर्थवर, राजकीय चर्चांना उधाण.
CM Devendra Fadnavis Meet Raj Thackeray : आज गणरायाचे सर्वत्र आगमन झाले. देशात सर्वत्र गणोशोत्सव जोरदार साजरा केला जात आहे. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरेंच्या दीड दिवसांचे गणपती विराजमान झाले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या बाप्पाच्या दर्शनासाठी शिवतीर्थवर गेले होते. शिवतीर्थवरून उद्धव ठाकरे बाहेर पडताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंकडे गणपती दर्शनाला पोहोचले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळातून चर्चांना उधाण आले आहे.