बातम्या
मंत्रीमंडळात एकही महिला मंत्री नसणं कमीपणाचं - अजित पवार
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजपासून दुसरा आठवडा सुरु होणार आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजपासून दुसरा आठवडा सुरु होणार आहे. आज महाराष्ट्राचे आर्थिक धोरण सभागृहामध्ये जाहीर केलं जाणार आहे. राज्याच्या अर्थसंकल्प उद्या (9 मार्च) सादर केला जाणार आहे.
आज अजित पवार यांनी सभागृहात जाण्यापूर्वी संवाद साधला यावेळी त्यांनी जागतिक महिला दिनाच्या महिलांशी शुभेच्छा दिल्या. तसेच सरकारवर टीका केली आहे. अजित पवार म्हणाले की, एवढ्या मोठ्या महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात एकही महिला मंत्री नसणं हे थोडसं कमीपणाचं वाटत असल्याचे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले.
महाराष्ट्र सरकारला ते शोभत नाही. नेमकी काय अडचण आहे? हे कळायला मार्ग नाही. ही गोष्ट आम्हालाही आणि महिला वर्गाला योग्य वाटत नाही. असे अजित पवार म्हणाले.