गुहागरमध्ये निलेश राणेंच्या ताफ्यावर दगडफेक; भास्कर जाधवांच्या कार्यालयाबाहेर राडा

गुहागरमध्ये निलेश राणेंच्या ताफ्यावर दगडफेक; भास्कर जाधवांच्या कार्यालयाबाहेर राडा

निलेश राणे यांची सभा काही वेळातच गुहागरमध्ये चालू होणार आहे. भास्कर जाधव यांचे कार्यालय मुंबई गोवा मार्गावर असल्यामुळे निलेश राणे यांच्या गाड्यांचा ताफा भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोरूनच जाणार आहे.
Published by :
shweta walge

निलेश राणे यांची सभा काही वेळातच गुहागरमध्ये चालू होणार आहे, भास्कर जाधव यांचे कार्यालय मुंबई गोवा मार्गावर असल्यामुळे निलेश राणे यांच्या गाड्यांचा ताफा भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोरूनच जाताच त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. यावेळी पोलीसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधूराच्या कांड्या फोडल्या.निलेश राणे यांची आज गुहागरमध्ये जाहीर सभा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर गुहागरमध्ये दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले.

निलेश राणे यांची भास्कर जाधवांच्या गुहागर मतदारसंघात तळी येथे सायंकाळी 5 वाजता जाहीर सभा आयोजित करण्यात आली. भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यावेळी नारायण राणे पिता पुत्रांवर तुफान टीका केली होती. त्याला उत्तर म्हणून निलेश राणे यांनी गुहागमध्ये आज सभेचं आयोजन केलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com