Jalgaon : जळगावमध्ये क्रिकेट खेळण्याच्या वादातून दोन गटात दगडफेक, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

जळगाव (Jalgaon) शहरातील तांबापुरा परिसरात दोन गटात किरकोळ कारणावरुन दगडफेक झाल्याची घटना घडली आहे.
Published by :
Varsha Bhasmare

जळगाव (Jalgaon) शहरातील तांबापुरा परिसरात दोन गटात किरकोळ कारणावरुन दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. क्रिकेट खेळण्याच्या वादातून दोन गटात ही दगडफेक झाल्याची माहिती समोर येत आहे. या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात असून पोलिसांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे.

दोन गटात तुफान दगडफेक

जळगाव शहरातील तांबापुरा परिसरात क्रिकेट खेळण्याच्या वादातून दोन गटात तुफान दगडफेक झाली आहे. तांबापुरा परिसरातील टिपू सुलतान चौक व गवळी वाडा चौक येथे दोन गटात तुफान दगडफेक झाली. किरकोळ कारणातील वादातून ही दगडफेक झाली आहे. याप्रकरणी या परिसरात पोलिसांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात असून पोलिसांनी शांततेचे आवाहन नागरिकांना केले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com