नंदुरबारमध्ये दोन गटाकडून दगडफेक; पोलिस कर्मचारी जखमी
Admin

नंदुरबारमध्ये दोन गटाकडून दगडफेक; पोलिस कर्मचारी जखमी

नंदुरबारमध्ये दोन गटाकडून दगडफेक झाली असून यात पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत.

प्रशांत जव्हेरी, नंदुरबार

नंदुरबारमध्ये दोन गटाकडून दगडफेक झाली असून यात पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. नंदुरबारमधील महाराष्ट्र व्यायाम शाळा परिसरातील घटना घडली आहे. पोलीस तपास करत असून दगडफेकीचं कारण अस्पष्ट आहे.

दोन्ही गटांनी वाहने पेटवली. त्यामुळे लोकांमध्ये एकच घबराट निर्माण झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त जमावाने पोलिसांवरच दगडफेक केली. 

या सर्वांची कसून चौकशी करण्यात येत आहे. या घटनेनंतर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com