kalyan
kalyan Team Lokshahi

भाजप,शिंदे गटात वादाची ठिणगी, मुख्यमंत्र्यांवर केलेल्या आरोपावर मंत्री रवींद्र चव्हाणांना शिंदे गटाकडून जोरदार प्रतिउत्तर

रवींद्र चव्हाण यांच्या आरोपाला आज शिंदे गटातील माजी नगरसेवकांनी दिले उत्तर

अमजद खान। कल्याण: रत्स्यावरून मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष केल्यानंतर शिंदे गटातील नेते दीपेश म्हात्रे यांनी रवींद्र चव्हाण यांना प्रत्युत्तर दिले आहे. काल मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले होते त्यामुळे वादाची ठिणगी पुन्हा भाजप आणि शिंदे गटात सुरु झाली आहे. त्यालाच आता दीपेश म्हात्रे यांनी रवींद्र चव्हाण यांना प्रत्युत्तर दिले आहे. इतकंच नव्हे तर गुवाहाटीतून येताना शिंदे साहेबाना आमची कामे करा असे कानात सांगायचे होते असा टोला म्हात्रे यांनी लगावला.

kalyan
रामदास कदम शरीराने शिंदेंजवळ मात्र, मनाने ठाकरेंजवळच?

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी रविवारी एका शाळेच्या कार्यक्रमादरम्यान कल्याण शिल रोडचे संथ गतीने सुरू असलेले काम, डोंबिवली शहरातील रस्त्यांचे रखडलेले काम यावरून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष केले .त्यामुळे शिंदे फडणवीस सरकार मधील कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष केल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. रवींद्र चव्हाण यांच्या आरोपाला आज शिंदे गटातील माजी नगरसेवकांनी जोरदार प्रतिउत्तर दिले.

kalyan
पैसे घेऊन सत्तातंर घडविले, माझ्याकडे पुरावे; शिवसेना आमदाराचा गौप्यस्फोट

माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी थेट चव्हाण यांना लक्ष केलं. रवींद्र चव्हाण हे कॅबिनेट मंत्री आहेत. हेच ते विसरले आहेत, 13 वर्षांपासून डोंबिवलीतील अनेक विकास काम रवींद्र चव्हाण यांच्या मुळे रखडलेले आहेत, रवींद्र चव्हाण हे ज्या चारशे कोटींचा उल्लेख करतात ते कधी मंजूर झालेच नव्हते, तर कोटीची कामे मंजूर झाली ते कुणी सांगत नाही. रवींद्र चव्हाण हे गुवाहाटीत देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत होते, तेव्हा त्यांनी त्यांना सांगायला पाहिजे होतं. डोंबिवलीतील विकासकामे करा तेरा वर्षात चव्हाण यांच्याकडून काही कामे झाली नाह. त्यांच्या विभागात डोंबिवलीतील दोन रस्ते येतात दीड महिने झाले ते मंत्री झाले. परंतु अद्यापही त्या दोन रस्त्यांचे काम सुरू झालेली नाही आपले पाप लपवण्यासाठी असे आरोप करतात असा टोला म्हात्रे यांनी चव्हाण यांना लगावला.

Lokshahi
www.lokshahi.com