Gujrat Titans Vs Punjab Kings
Gujrat Titans Vs Punjab Kings

पंजाब किंग्जविरोधात गुजरात टायटन्सचा पराभव का झाला? स्टुअर्ट ब्रॉड म्हणाला, "जर शुबमन गिलने..."

पंजाबने गुजरातचा पराभव केल्यानंतर माजी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
Published by :

पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात अहमदाबादमध्ये आयपीएलचा रंगतदार सामना झाला. पंजाबने गुजरातचा पराभव केल्यानंतर माजी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. गुजरात टायटन्सचं नेमकं काय चुकलं? याबाबत ब्रॉडने माध्यमांशी संवाद साधताना मोठी प्रतिक्रिया दिली आहे. ब्रॉड म्हणाला, फलंदाजी करताना जर शुबमन गिलने जास्त चेंडू खेळले असते, तर गुजरात टायटन्सन हा सामना जिंकू शकला असता.

स्टुअर्ट ब्रॉड काय म्हणाला?

शुबमन गिलने खूप चांगले फटके मारले. विशेषत: कगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर जबरदस्त षटकार मारला. तो एक क्लासिकल शॉट होता. पण गुजरातचा संघ हा सामना जिंकू शकला असता, असं मला वाटतं. शुबमनने ६० चेंडू खेळले असते, तर परिस्थिती वेगळी असती. त्याला पॉवरप्लेमध्ये जास्त स्ट्राईक मिळाली नाही. तसंच तो डेथ ओव्हर्समध्ये जास्त चेंडू खेळू शकला नाही. त्यामुळे खूप फरक पडला.

आयपीएल २०२४ चा १७ वा सामना गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात झाला. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. या मैदानात पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात अतितटीची लढत झाली. गुजरात टायटन्सने २० षटकांत ४ विकेट्स गमावून पंजाबला १९९ धावांचं आव्हान दिलं होतं. त्यानंतर या धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या पंजाब किंग्जने १९.५ षटकात २०० धावा केल्या आणि गुजरातचा ३ गडी राखून पराभव केला. गुजरात टायटन्ससाठी कर्णधार शुबमन गिलने चमकदार कामगिरी केली. त्याने या हंगामातील सर्वात मोठी वैयक्तित खेळी केली. गिलने ४८ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकार ठोकून नाबाद ८९ धावा कुटल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com