Ajit Pawar Death : 'एवढा मोठा अपघात पण एकही कागद जळाला नाही...' अजित पवारांच्या अपघातावर अमोल मिटकरींचा सवाल
Amol Mitkari On Ajit Pawar Death: महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून टाकणारी घटना बुधवारी (दि. 28) सकाळी घडली. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे बारामतीत चार्टर्ड विमान अपघातात निधन झाले. सकाळी सुमारे 8.45 वाजता बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान विमान कोसळले, या भीषण दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये त्यांचे सुरक्षा रक्षक, दोन पायलट आणि एक महिला क्रू मेंबर यांचा समावेश आहे. अजित पवार हे 66 वर्षांचे होते. या अपघाताची बातमी समजताच संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली बारामतीत वातावरण अत्यंत शोकाकुल झाले असून पवार कुटुंबीय, कार्यकर्ते आणि नागरिकांना अश्रू अनावर झाले. यावर आता महाराष्ट्रात जोरदार राजकारण सुरु झाले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अमोल मिटकरी यांनी ट्विट टाकत अनेक प्रश्न उपस्थितीत केले आहे.
अमोल मिटकरी यांनी नेमकं काय लिहिलं आहे पोस्टमध्ये...
आदरणीय दादा गेले हे अजूनही कुणाचंच मन मान्यायला तयार नाही. काल देवगिरीवरील त्या दोन खुर्च्या बघून परत डोळे पाणावले 😢
त्यातील पहिली खुर्ची – सामान्य माणसाची कामे वा तक्रार नीट बाजूला बसून ऐकणाऱ्या व्यक्तीची.
आणि दुसरी – आदरणीय दादांची!!
मृत्यूच्या अगोदरिल दिवशी दुपारनंतर कुठलाच कार्यक्रम नव्हता. दादा याच ठिकाणी पक्षातील कार्यकर्त्यांना भेटल्याचे काल समजले. दुसऱ्या दिवशी याच खुर्चीवरून कामे आटोपून दादा बारामतीकडे निघाले. गेले तीन दिवस मनात शंकेचं काहूर आहे.
प्रश्नांचा आगडोंब उसळतोय. मृत्यूचे राजकारण करण्याचं पाप मी तरी करणार नाही.
मात्र हे प्रश्न माझं मन विचारतंय—
• अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात 5 मृतदेहच का सापडले?
• सहावी व्यक्ती कुठे गेली?
• Take-off आधी प्रवासी यादी digitally नोंदलेली असते, मग विसंगती का?
• एखादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही???
• एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले?
प्रश्न विचारणं म्हणजे अफवा नाही.
थोडक्यात
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे बारामतीत चार्टर्ड विमान अपघातात निधन झाले.
आता महाराष्ट्रात जोरदार राजकारण सुरु झाले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अमोल मिटकरी यांनी ट्विट टाकत अनेक प्रश्न उपस्थितीत केले आहे.

