"तुझ्याशी फ्लर्ट करायची...." दिग्गज अभिनेत्याच्या मेसेजवर प्राची पिसाटचे प्रखर उत्तर

"तुझ्याशी फ्लर्ट करायची...." दिग्गज अभिनेत्याच्या मेसेजवर प्राची पिसाटचे प्रखर उत्तर

प्राची पिसाटने अभिनेत्याच्या फ्लर्टिंग मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करत केले तीव्र उत्तर, मराठी इंडस्ट्रीत चर्चेचा विषय.
Published by :
Riddhi Vanne
Published on

बॉलिवूडमध्ये अनेकदा कास्टिंग काऊचच्या घटना घडल्याची माहिती उघड झाली आहे. दरम्यान, हा अनुभव आता मराठी इंडस्ट्रीमध्येही आला आहे. प्राची पिसाट ही मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. झी मराठीवरील 'तु चाल पुढं' या मालिकेच्या माध्यमातून तिला लोकप्रियता मिळाली आहे. प्राचीने आपल्या इंस्टावर काही मेसेजेचे स्क्रिनशॉट शेअर करत एका दिग्गज अभिनेत्यावर धक्कादायक आरोप केले आहे.

प्राची पिसाटने प्रसिद्ध दिग्गज अभिनेते सुदेश म्हशीलकर यांनी तिला केलेल्या मेसेजचे स्क्रिनशॉट शेअर केले आहेत. या स्क्रिनशॉटमध्ये सुदेश हे प्राचीसोबत फ्लर्ट करत असल्याचे दिसत आहेत. यामुळे प्राची चांगलीच संतापलेली पाहायला मिळत आहेत.

काय लिहिलंय प्राचीने पोस्ट केलेल्या स्क्रिनशॉटमध्ये

सिने अभिनेते सुदेश म्हशीलकर यांनी प्राचीला फेसबुकवर मेसेज केले. या स्क्रिनशॉटमध्ये असं दिसून येतयं की, तुझा नंबर पाठव ना.. तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झालीये.. कसली गोड दिसत आहे, असं सुदेश यांनी प्राचीला मेसेज केले आहेत.

या मेसेजला प्राचीने सुदेश यांना प्रखर उत्तर दिले आहे. स्क्रिनशॉट शेअर करत प्राची बोलते की, मला स्क्रिनशॉट पोस्ट करण्याची इच्छा झाली ... तुमच्या बायकोचा नंबर असेलत... ती सुद्धा गोड असेल... बघा जरा तिच्याशी फ्लर्ट करायला जमत आहे का ते... ही पोस्ट डिलीट करायला कुठून तरी नंबर मिळवशील ना किंवा कॉल करशीलच' असे प्राचीने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'इच्छा नसेल माफी मागायची आणि तुम्हाला वेळ असेल तर बाकीच्या मुलींनी सांगितलेले तुमचे किस्सेही सांगू शकते...'

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com