सारस पक्ष्यांच्या संवर्धनासाठी प्रोत्साहन राशी देणार - सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

सारस पक्ष्यांच्या संवर्धनासाठी प्रोत्साहन राशी देणार - सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

सारस पक्ष्यांच्या संवर्धनासाठी प्रोत्साहन राशी देणार - सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

उदय चक्रधर, गोंदिया

गोंदिया जिल्ह्याचे वैभव आणि निसर्ग सौंदर्याची प्रतिक तसेच शेतकऱ्याचा मित्र व संपूर्ण महाराष्ट्रात फक्त गोंदिया जिल्ह्यात आढळणारा सारस पक्षाच्या संवर्धनासाठी आणि त्यांच्यासाठी घरटे बांधणऱ्या “सारस मित्रांना” प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या वन विभागाने पुढाकार घेतला आहे. वनमंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भात मुंबई येथे बैठक घेवून पक्षाचे संवर्धन करणाऱ्या शेतमालाच्या प्रोत्साहानात्मक बक्षीसाकरीता तरतूद करण्याचा महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला. व्याघ्र प्रकल्पाच्या नियामक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

गोंदिया जिल्ह्यातील व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानच्या सन २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात खाजगी जमीनीवर सारस पक्षांना घरटे बांधल्यावर घरट्यांचे व पक्ष्यांचे संवर्धन करणाऱ्या प्रोत्साहानात्मक रक्कम देण्याची तरतूद करण्यात आली होती. सारस पक्षाचे घरटे असलेल्या भातशेती करणाऱ्या शेतकऱ्याला दर वर्षी किमान १० हजार रुपये प्रोत्साहानात्मक रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सारस पक्ष्यांचे विणीचा हंगाम संपून सारस पक्षी पिलांना दुसरीकडे घेऊन जाईपर्यंत शेतमालकाने सारस पक्षांची संरक्षण देण्यात यावे. गोंदिया जिल्ह्यातील वाघ नदी तसेच गोंदिया व भंडारा जिल्ह्याच्या सिमेवरुन वाहणाऱ्या वैनगंगा नदीचे खोरे व त्यालगत असलेल्या भाताच्या शेतीत तसेच तलावामध्ये सारस पक्ष्यांचे अस्तित्व आहे. सारस हा स्थानिक स्थलांतर करणारा पक्षी असून दलदल व पानस्थळ पर्यावरण हा त्याचा मुख्य अधिवास आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com