Sudhir Mungantiwar Press Conference
Sudhir MungantiwarLokshahi

"वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत"; आमदार जितेंद्र आव्हाडांच्या विधानाला मुनगंटीवारांनी दिलं प्रत्युत्तर, म्हणाले...

वाघनखांबाबत नवीन वाद समोर आला आहे. वाघ नखे छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत, असा दावा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात केला होता. यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
Published by :

Sudhir Mungantiwar On Jitendra Awhad : वाघनखांबाबत नवीन वाद समोर आला आहे. वाघ नखे छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत, असा दावा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात केला. यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज जगातील सर्व शिवभक्तांसाठी अभिमानाचा, आस्थेचा, गर्वाचा विषय आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमित राहतो. जेव्हा राज्याभिषेकाचं ३५० वे वर्ष सुरु झालं. तेव्हा याच सदस्यांनी असा भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला की हे ३५० वे वर्ष नाही. ३५० वे वर्ष हे २ जूनला तिथीनुसार आणि ६ जूनला तिथीनुसार २०२३ ला सुरु झालं आहे. कारण नसताना वाद निर्माण करायचा, कारण नसताना प्रश्न उपस्थित करत आहेत.

मुनगंटीवार पुढे म्हणाले, मी सभागृहात जेव्हा निवेदन केलं, तेव्हा प्रश्न उपस्थित केले नाहीत आणि गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला. ५ नोव्हेंबर २०२२ रोजी जेव्हा प्रस्ताव आला होता की, शिवभक्त अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण हटवण्याची मागणी २९ जुलै १९५३ पासून करत आहेत. पण दुर्देवाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारने अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण नियमानुकूल करावं, असं ५ मे २०१८ ला ठरवलं. नियमानुकूल करण्यासाठी लागणारी कागदपत्रे त्या अफजलखानच्या कबरीचं उदात्तीकरण करणाऱ्या संस्थेनी दिलीच नाहीत.

पाच वर्षामध्ये ती कागदपत्रे न दिल्याने तो प्रस्ताव समोर आला नव्हता. १० नोव्हेंबर २०२२ ला महाशिवप्रतापदिनी अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण हटवण्यात आलं. शिवभक्तांनी सांगितलं की, लंडनच्या मुझ्यियममध्ये असणाऱ्या वाघनखांचा बॉक्स १८७५ मध्ये केला होता. मुघल सामाज्याला संपवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे, असं या बॉक्सवर लिहिण्यात आलंय. प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेल्या वाघनखांवर अशाप्रकारचा उल्लेख कुठेही नाही, असंही मुनगंटीवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com