Sudhir Mungantiwar met CM devendra fandvis
Sudhir Mungantiwar met CM devendra fandvisSudhir Mungantiwar met CM devendra fandvis

Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; भेटीदरम्यान काय चर्चा झाली...

नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांनंतर निर्माण झालेल्या अस्वस्थतेमुळे भाजपमध्ये हालचाली वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
Published by :
Riddhi Vanne
Published on

Sudhir Mungantiwar met CM devendra fandvis : नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांनंतर निर्माण झालेल्या अस्वस्थतेमुळे भाजपमध्ये हालचाली वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर पक्षातील तणाव कमी झाल्याचे संकेत मिळू लागले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः आपल्या सोशल मीडिया खात्यावर मुनगंटीवार यांच्यासोबतचा फोटो शेअर केला. त्यामुळे काही दिवसांपासून चर्चेत असलेली नाराजी आता निवळत असल्याचे चित्र दिसत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील निकालामुळे ही नाराजी उफाळून आली होती. राज्यात इतर ठिकाणी महायुतीला चांगले यश मिळाले असले, तरी चंद्रपूरमध्ये भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. जिल्ह्यातील 11 नगरपंचायतींपैकी 8 ठिकाणी काँग्रेसचे नगराध्यक्ष निवडून आले, तर भाजप फक्त दोन ठिकाणी विजयी झाला. या अपयशामुळे पक्षात नाराजी वाढली.

या निकालानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षाच्या कामकाजावर उघडपणे असमाधान व्यक्त केले होते. काँग्रेसने आपल्या नेत्यांना पाठबळ दिले, मात्र आपल्या पक्षात मला तेवढे सहकार्य मिळाले नाही, असे सूचक विधान त्यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा रोख मुख्यमंत्री फडणवीसांकडे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती.

या वक्तव्यानंतर भाजपमध्ये अंतर्गत मतभेद असल्याच्या चर्चा रंगल्या. विरोधी पक्षांनीही याचा फायदा घेत भाजपवर टीका केली. अशा परिस्थितीत मुनगंटीवार आणि फडणवीस यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. भेटीत नेमकी काय चर्चा झाली, हे जरी समोर आले नसले, तरी पक्षाची दिशा, पुढील राजकीय योजना आणि संघटनात्मक बाबींवर संवाद झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सुधीर मुंगटीवार ट्विटमध्ये लिहितात की,

राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांची मुंबई येथील वर्षा निवासस्थानी आज भेट घेऊन विविध विकासात्मक विषयांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी शेतकऱ्यांना धानाचा प्रति हेक्टर २० हजार बोनस, आधारभूत धान खरेदी नोंदणीची अंतिम तारीख ३१ जानेवारीपर्यंत वाढविणे, अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती नुकसानीसाठी विशेष बाब म्हणून ३ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रधारक शेतकऱ्यांना मदत, तसेच बल्लारपूर येथे ईएसआयसी रुग्णालय, राज्य राखीव पोलीस बल व महिला सहकारी औद्योगिक वसाहतीसाठी मौजा विसापूर येथील बंद असलेल्या पावर हाऊसची ३१.३५ हेक्टर मधील जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात तसेच आदी विषयांवर आग्रही मागणी केली. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या सर्व मागण्यांना अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत तात्काळ कार्यवाहीचे स्पष्ट निर्देश दिले. शेतकरी बांधवांच्या हितासाठी आणि आरोग्यविषयक महत्त्वाच्या प्रश्नांसाठी दाखवलेल्या या संवेदनशील व दूरदर्शी भूमिकेबद्दल त्यांचे मनस्वी आभार.

थोडक्यात

  • सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट..

  • 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा..

  • निकालानंतर मुनगंटीवारांनी व्यक्त केली नाराजी..

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com