उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करा, म्हणजे...; सुहास कांदे
Admin

उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करा, म्हणजे...; सुहास कांदे

मालेगावमध्ये काल(26मार्च) उध्दव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली आहे.

मालेगावमध्ये काल(26मार्च) उध्दव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली आहे. या सभेत त्यांनी मुख्यमंत्री शिंदेसोबत सर्वांवर चांगलाच निशाणा साधला. मुख्यमंत्री स्वतःच्या शेतात रमत आहे. पण, शेतकऱ्यांच्या बांधावर यायला त्यांना वेळ नाही. मला उत्तर देण्यासाठी येथे उत्तर सभा घेणार आहेत ना. त्यापेक्षा शेतकऱ्यांना उत्तर द्या, असे आवाहन त्यांनी शिंदे-फडणवीसांना केले आहे.

याच पार्श्वभूमीवर एका माध्यमाशी बोलताना शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरेंची सभा पाहून मला बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून उद्धव ठाकरेंची दया आली. आम्ही एक रुपया घेतला असेल तर आमची नार्को टेस्ट करा. ती जाहीरपणे कॅमेरे लावून करा. आम्ही खोका सोडा एक रुपया घेतला असेल, तर सत्य समोर येईल. असे सुहास कांदे म्हणाले.

तसचे ठाकरेंची सभा फक्त टोमण्यांची सभा होती. जर श्रीधर पाटणकरांना अटक झाली तर त्यांच्या चौकशीतून संशयाची सुई कोणाकडे जाईल, याच भीतीपोटी उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. यासाठी उद्धव ठाकरेंचीही नार्को टेस्ट करा. म्हणजे कुठल्या कंपनीकडून किती पैसे घेतलेत हे समजेल. असे म्हणत सुहास कांदेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com