लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा भ्रम उतरेल - खासदार सुजय विखे
Admin

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा भ्रम उतरेल - खासदार सुजय विखे

काॅग्रेस नेते राहूल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केलेल्या टिकेचा समाचार घेतांना संगमनेर येथे खासदार सुजय विखे बोलत होते.

आदेश वाकळे, संगमनेर

काॅग्रेस नेते राहूल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केलेल्या टिकेचा समाचार घेतांना संगमनेर येथे खासदार सुजय विखे बोलत होते पंतप्रधान मोदी यांच्यावर टिका करण्यासाठी कोणतीही जागा नाही त्यामुळेच महापुरुषांवर टिका करून प्रसिध्दी मिळविण्याचा प्रयत्न देशातील व राज्यातील नेते करतात.कश्मिर मध्ये मोदीनी तिरंगा फडकवला तेव्हा परीस्थिती वेगळी होती.आज तुम्ही गेलात तेव्हा मोदीजीमुळे बदललेल्या परीस्थीतीमुळेच तेव्हा हे स्वातंत्र्य कोणामुळे याचा विचार त्यांनी टिका करांनी करावा असे विखेंनी सांगितले आहे.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा भ्रम उतरेल असेही खासदार सुजय विखेनी सांगितले आहे.देशातील जेष्ठ नागरिकांचा विचार करणारा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रुपाने प्रथमच देशाला मिळाला. राष्ट्रीय वयोश्री योजनेपासून ते जलजीवन मिशन पर्यतच्या सर्व योजनांमधून सर्वसामान्य नागरीकांचे हित जोपासण्याचा प्रयत्नच केंद्र सरकारच्या माध्यमातून होत असल्याचे प्रतिपादन खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी केले.केंद्र सरकारने जेष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेल्या राष्ट्रीय वयोश्री योजनेतील पात्र लाभार्थींना साधन साहीत्याचे वाटप करण्यासाठी संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात खा.विखे बोलत होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com