Sunetra Pawar : इतिहास घडला! सुनेत्रा पवार झाल्या पहिल्या महिल्या उपमुख्यमंत्री, नवे नेतृत्व
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आज एक महत्त्वाचा राजकीय टप्पा गाठला गेला. त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून, त्या या पदावर पोहोचणाऱ्या राज्यातील पहिल्या महिला ठरल्या आहेत.
राजभवन येथे झालेल्या शपथविधीत राज्यपालांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार उपस्थित होते.
शपथविधीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली. त्यांच्याकडे आता पक्षाची संपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दुखवट्याच्या पार्श्वभूमीवर घडलेला हा राजकीय बदल राज्याच्या राजकारणात नवे पर्व सुरू करणारा ठरत आहे.
थोडक्यात
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महत्त्वाचा राजकीय टप्पा
त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली
सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या
राज्याच्या राजकारणात ऐतिहासिक घडामोड
या शपथविधीमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा

