Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली
राज्यात मराठी भाषेवरुन राज ठाकरेंचे मनसैनिक तापलेले पाहायला मिळाले. त्यानंतर उद्धव ठाकरेंकडून देखील मराठी भाषेसाठी आक्रमक झालेले पाहायला मिळाले. याचपार्श्वभूमिवर उद्या 5 जुलैला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा विजयी मेळावा वरळी डोम येथे होणार आहे. राज्यात मराठी भाषेचा वाद उफाळलेला असताना केडियानोमिक्सचे संस्थापक सुशील केडिया यांनी त्यांच्या सोशल मीडियावर "मराठी शिकणार नाही" असं जाहीर केलं आहे.
यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया पडताना दिसत आहेत. अशातच उत्तर भारतीय सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला लोकशाही मराठीसोबत बोलताना म्हणाले की," हा देश संविधानाने चालतो, त्यामुळे भाषेची सक्ती कोण करु शकत नाही. पुढे राज ठाकरेंना बोलताना सुनील शुक्ला म्हणाले की, तु कोण आहे मराठी भाषा शिका असं बोलणारा, महाराष्ट्र ही राज ठाकरेची जबाबदारी आहे का? भाषेला तुम्ही खराब केलं. आम्हाला मराठीचा अभिमान आहे, पण भाषेचा अपमान राज ठाकरे आणि त्यांचे लोक करत आहेत".