ताज्या बातम्या
Sunil Tatkare : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार? तटकरेंनी स्पष्टचं सांगून टाकलं
सुनील तटकरे यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का? यावर आपली ठोस प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का? यावर आपली ठोस प्रतिक्रिया दिली आहे. तसेच सुनिल तटकरे म्हणाले की,"महायुती म्हणून आमची निवडून एकत्र लढण्याची तयारी आहे. मात्र राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी परिस्थिती आहे. मात्र अशी परिस्थिती असली तरी आम्ही महायुतीच्या विचाराला तडा जाऊ देणार नाही याची आम्ही काळजी घेऊ".
"दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील का? असा कोणताही प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये नाही. असा कोणताही ठराव आम्ही आगामी अधिवेशनात ठेवणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस ने केंद्रात किंवा राज्यात सत्तेत जाव अशी वरिष्ठ स्तरावर चर्चा 2014 पासून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सुरू होती", असा सुनील तटकरे यांनी खुलासा केला.