Sunil Tatkare : नाशिकच्या जागेसाठी आम्ही आग्रही आहोत

Sunil Tatkare : नाशिकच्या जागेसाठी आम्ही आग्रही आहोत

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच माध्यमांशी बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, नाशिकच्या जागेसाठी आम्ही आग्रही आहोत. परंतु पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ आल्यामुळे सर्व नेते मंडळी मतदारसंघांमध्ये प्रचारार्थ त्याठिकाणी आहेत.

तसेच सुनील तटकरे पुढे म्हणाले की, नाशिक हा पाचवा टप्पा आहे. सिंधुदुर्गचे मतदान तिसऱ्या टप्प्यांमध्ये आहे. आज उद्या त्यासंदर्भामध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री महोदय चर्चा होऊत या संदर्भातला अंतिम निर्णय हा त्या ठिकाणी होईल.

मी वारंवार एक गोष्ट नमूद करत आलो की, 45 प्लस हे उदिष्ट आमच्या सर्वांच्यासमोर आहे. असे तटकरे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com