Sunil tatkare Sharad pawar sunetra pawar ajit pawar ncp two faction alliance
Sunil tatkare Sharad pawar sunetra pawar ajit pawar ncp two faction alliance

Sunil Tatkare : सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीबाबत सुनील तटकरेंची ठोस विधान म्हणाले की...

Sunil Tatkare : सुनील तटकरे यांनीही प्रतिक्रिया देताना सध्या कोणतेही ठोस विधान करण्यास नकार दिला. “आधी आमदारांची बैठक होऊ द्या, त्यानंतरच पुढील भूमिका स्पष्ट होईल,”
Published by :
Riddhi Vanne
Published on

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर राज्यातील राजकारण झपाट्याने बदलत आहे. उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी कोणाकडे जाणार आणि पक्षाची पुढील दिशा काय असणार, याबाबत अनेक तर्कवितर्क सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची महत्त्वाची बैठक होणार आहे.

याआधी सकाळी शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू होती आणि त्यावरचा निर्णय ठराविक तारखेला जाहीर होणार होता, असे स्पष्ट केले. तसेच सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीबाबत आपल्याला कोणतीही माहिती नव्हती, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, सुनील तटकरे यांनीही प्रतिक्रिया देताना सध्या कोणतेही ठोस विधान करण्यास नकार दिला. “आधी आमदारांची बैठक होऊ द्या, त्यानंतरच पुढील भूमिका स्पष्ट होईल,” असे त्यांनी सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादीतील पुढील चित्र काय असेल, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com