Sunil Tatkare
Sunil Tatkare

अजित पवार गटाच्या बैठकीत नेमकं काय घडलं? तटकरेंनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले,"महायुतीचा उमेदवार..."

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपासंदर्भात सर्वच पक्षांमध्ये खलबतं सुरु आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाने नुकतच बैठकीचं आयोजन केलं होतं.
Published by :

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपासंदर्भात सर्वच पक्षांमध्ये खलबतं सुरु आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाने नुकतच बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीत कोणत्या विषयांवर खलबतं झाली? असा प्रश्न राजकीय वर्तुळात रंगला होता. परंतु, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना मोठी प्रतिक्रिया दिली. तटकरे म्हणाले, महायुतीच्या उमेदवाराच्या पाठिमागे समर्थपणे उभं कसं राहता येईल, या दृष्टीकोनातून बैठकीत चर्चा झाली. देवेंद्र फडणवीसांना यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. एक-दोन दिवसात हे सर्व सुरळीत होईल, असा मला विश्वास आहे.

सुनील तटकरे माध्यमांशी बोलताना म्हणाले, तटकरे म्हणाले, माढा संदर्भात आज चर्चा झाली. रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दिपक चव्हाण यांच्योसाबत राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रांताध्यक्ष म्हणून मी या चर्चेत सहभागी होतो. या विषयावर आम्ही प्रदिर्घ चर्चा केली. इतर जागांबाबतही आम्ही चर्चा करत आहोत. वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघातही आम्ही आढावा घेतला.

तिसऱ्या टप्प्याचं नोटिफिकेशन आज निघालं आहे. या सर्वांचं नियोजन करण्यासाठी या बैठकीचं आयोजन केलं होतं. नाशिकच्या जागेचा तिढा सुटलेला नाही, यावर काही चर्चा झाली का? या प्रश्नाचं उत्तर देताना तटकरे म्हणाले, आमच्यात अंतर्गत चर्चा झाल्या आहेत. यापूर्वीही अमित शहा यांच्या उपस्थितीत चर्चा झाली होती, असंही तटकरे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com