Supreme Court : भटक्या कुत्र्यांसंदर्भात उच्च न्यायालयात सुनावणी
थोडक्यात
भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबत सर्वोच्च न्यायालयाने जुलै महिन्यात दिलेल्या निर्णयानंतर देशभरात विविध प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवण्याऐवजी नसबंदी हाच मुख्य उपाय असल्याचे स्पष्ट केले होते.
याच पार्श्वभूमीवर आज, 27 ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे.
भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबत सर्वोच्च न्यायालयाने जुलै महिन्यात दिलेल्या निर्णयानंतर देशभरात विविध प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर ऑगस्टमध्ये न्यायालयाने निर्णयात सुधारणा करत, भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवण्याऐवजी नसबंदी हाच मुख्य उपाय असल्याचे स्पष्ट केले होते.
याच पार्श्वभूमीवर आज, 27 ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे. या प्रकरणात दिल्लीतील भटक्या कुत्र्यांचा मुद्दा केंद्रस्थानी असला, तरी न्यायालय इतर राज्यांसाठीही दिशा-निर्देश देऊ शकते. त्यामुळे प्राणीप्रेमींचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे.
सर्वोच्च न्यायालय सुवोमोटो’ याचिकेसह एकूण चार अर्जांची सुनावणी घेणार आहे. २२ ऑगस्ट रोजी न्यायालयाने या प्रकरणाची व्याप्ती दिल्लीपुरती मर्यादित न ठेवता सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पक्षकार बनवले होते.
या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती संदीप मेहता आणि न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारिया यांच्या विशेष खंडपीठासमोर होणार आहे. देशभरात वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर या सुनावणीतून महत्त्वाचे निर्देश अपेक्षित आहेत.

