सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकाच दिवशी भरणार उमेदवारी अर्ज

सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकाच दिवशी भरणार उमेदवारी अर्ज

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकाच दिवशी उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती मिळत आहे. 18 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे.

महविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे, रवींद्र धंगेकर, अमोल कोल्हे हे उमेदवारी अर्ज भरणार आहे तर महायुतीकडून सुनेत्रा पवार, मुरलीधर मोहोळ आणि शिवाजीराव आढळराव पाटील भरणार उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

महायुतीच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येणार आहेत. तसेच महविकास आघाडीच्या उमेदवारासाठी शरद पवार, संजय राऊत आणि काँग्रेसचे बडे नेते येणार असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com